logo

Need a helping hand?
Call us on - 8888982222

Countoura Vision

दृष्टीदोष एक समस्या

दृष्टी दोषाचे प्रमाण मागील काही दशकामध्ये मोठया प्रमाणात वाढत आहे त्यामुळे चष्मा घालण्याचे प्रमाण ही झपाटयाने वाढते आहे. पूर्वी आपल्या शाळेत ४ - ५ मुलांना चष्मे असायचे त्यांना त्यांना कंदिल म्हणुन चिडवायचे आता प्रत्येक वर्गात १० - १५ कंदील दिसू लागले आहेत लहान पणी दृष्टीचा विकास होत असताना वाढता टेलीव्हिजन, व्हिडीओ गेम’, संगणकाचा उपयोग, मोबाइल, बारीक प्रिंटची पुस्तके हयामुळे अतिरिक्त ताण पडल्यामुळे अतिशय कमी वयात दृष्टीदोष निर्माण होऊन मोठी चिंताजनक परिस्थिती झाली आहे. चष्मा असल्यामुळे हया मुलांना पुढे सैन्यात जाणे, पोलिस भर्ती, पायलट होणे, नेव्ही जॉइन करणे, रेल्वेत यु पी एस सी परिक्षा, मॉडेलींग, टी व्ही चित्रपटात भुमिका आदी खुप ठिकाणी नकार मिळतो तर तरूणींना असणा-या चष्म्यामुळे लग्नास अडचणी निर्माण होतात ज्यांना चष्म्याचा नंबर जास्त आहे त्यांना तर अपंग माणसासारखी परिस्थिती निर्माण होते.जसे अपंगाला कुबडी शिवाय चालता येत नाही त्याच प्रमाणे झोपेतुन उठल्यावर चष्मा डोळयावर लावल्याशिवाय काहीच करता येत नाही. च्त्येक चष्मा असणार्या माणसाला हा चष्मा नकोसा झाला आहे.

साई सूर्य नेत्रसेवा जागतिक नेतृत्व

अहमदनगरचे लेसर नेत्रशस्त्रक्रिया तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सौ. सुधा कांकरिया यांनी १९८५ साली रशियाला जाऊन डॉ. फेदरोव्ह यांच्याकडून रेडियल कॅरेटोटॉमी हे तंत्रज्ञान शिकुन आल्यानंतर अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेची स्थापना करून भारताच्या नेत्रशास्त्रामध्ये इतिहास घडविला. अहमदनगर सारख्या लहान गावाकडे संपुर्ण भारतातुन व बाहेर देशातुनही रूग्ण येवू लागले. त्यानंतर १९८८ साली अत्याधुनिक मोतिबिंदुच्या फॅकोइमल्सीफिकेशन तंत्रज्ञान विकसीत केले. १९९० साली ऑटोमेटेड लॅमिलर कॅरॅटोप्लास्टी तर १९९५ साली लॅसिक शस्त्रक्रियेचा उपयोग सुरू केला त्यावेळी सॉलीड स्टेट लेझर वर आशिया खंडात पहिल्यांदा लॅसिक शस्त्रक्रिया अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा मध्ये होऊ लागली. त्यानंतर व्हेवफ्रंट गाईडेड लेसर ट्रिटमेंट, आय सी एल, रिफ्रॅक्टीव्ह लेंस एक्सचेंज, केरॅटोकोनस ट्रिटमेंट, एपीलॅसीक अशा अनेक शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी एकाच छताखाली असणारे डॉ. कांकरियांचे साई सूर्य नेत्रसेवा ही भारतातील पहीले दालन ठरले. आता त्यांचे चिरंजीव डॉ. वर्धमान कांकरिया व डॉ. श्रुतिका कांकरिया यांच्या बरोबर पुणे येथील एशियन आय हॉस्पीटलची उभारणी करून आता स्माईल, फ्लेम्टो लॅसीक, झेप्टो लेसर मोतिबिंदूचे मल्टी फोकल तंत्रज्ञान भारतात प्रथम आणण्याचा पराक्रम ही केला. आणि आता नुकतेच साई सूर्य नेत्रसेवा येथे कॉनटयुरा व्हिजन हे तंत्रज्ञान आले आहे त्यात नुसताच चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी सर्वांना देणे शक्य झाले आहे.

डॉ. प्रकाश कांकरिया यांना मागील ३४ वर्षांचा या शास्त्राचा अनुभव असून सुमारे २ लाखांपेक्षाही अधिक नेत्रशस्त्रक्रिया करणार्या नेत्रतज्ज्ञामध्ये त्यांचे स्थान आहे. एका दिवसात ८ तासात शंभरपेक्षा जास्त लॅसिक लेसर शस्त्रक्रिया जगात प्रथमच त्यांनी केल्या असुन आज पर्यंत ५० शतकांची नोंद त्यांच्या नावावर आहे व ते जगातील एकमेंव नेत्रतज्ज्ञ आहेत. इंडियन मेडीकल असोसिएशन अहमदनगरचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नेत्रसंस्थाचे सर्वात तरूण माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे अखिल भारतीय रिफ्रॅक्टीव्ह सर्जन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तर अनेक आंतरराष्ट्रीय नेत्रसंस्थाचे विशेष सभासद आहेत व मानकन्हैय्या नेत्रपिढी ही भारतातील पहीली खाजगी नेत्रपिढी असून नेत्ररोपणाच्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया त्यांनी हजारोंनी केल्या आहेत. आपल्या आई वडिलांचे स्वत: मरणोत्तर नेत्रदान करून नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करू शकणारे भारतातील ते एकमेव नेत्रतज्ज्ञ आहेत. मोतीबिंदुच्या नेत्रशिबीराप्रमाणेच चष्म्याचे नंबर घालविण्याच्या शस्त्रक्रियेचे भारतभर शिबीरे घेवून हे तंत्रज्ञान भारतात अतिशय लोकप्रिय झाले असुन त्यांच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे हजारो युवकांना चष्म्यामुळे हरवलेले त्यांचे आयुष्याचे स्वप्न पुन्हा पुर्ण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आहे. हजारो मुलींची लग्न झाली असून अनेकजण पायलट, नेव्ही, सैन्य, पोलीस भरती ई. मध्ये आपले करियर मिळवू शकले आहे.

चष्मा घालवा कायमचा
आता नविन अस्त्र कॉन्टूरा

चष्म्याचा नंबर व दृष्टीदोष घालविण्यासाठी दोन डझन पेक्षाही अधिक वेगवेगळया प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रिया विकसीत झाल्या असून एकाच छताखाली त्या उपलब्ध असणार्या जगातील मोजक्या संस्थेमध्ये साई सूर्य नेत्रसेवा व एशियन आय हॉस्पिटल ठरल्या आहेत. सर्व नेत्र उपचारांच्या पध्दतीत संगणक तंत्रज्ञानामुळे व ३५ वर्षांच्या दांडगया अनुभवामुळे -०.५ ते -३०.० तर +१८ नंबरच्या चष्म्याचे नंबर घालविणे आता शक्य झाले आहे. डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांनी -४२.० हा जगातील सर्वात मोठा नंबर ही घालून दाखवला आहे.

आत्ता पर्यंतच्या लॅसीक लेसर नेत्रशस्त्रक्रिया स्माईल व इतर दृष्टीदोष घालविण्याच्या उपचार पध्दतीत डोळयाच्या बाहुलीचा मध्यबिंदूवर (Pupillary Axis) के्रद्रित लेसर किरणांचा उपचार केला जात असे परंतू आता (Contoura)कॉॅन्टूरा ह्या लेसर उपचार पध्दतीने संपूर्ण बदल घडवून आणला असून आता दृष्टीबिंदू केंद्रित (Visual Axis) उपचार करता येतात ही पध्दत सर्वात चांगली पध्दत म्हणून समजली जाते. बुबुळाच्या (उेीपशर) काही अनियमितता (Topo guided Treatment) कॉन्टूराने उपचार होत असल्यामुळे आता अशा रूग्णांचा नुसताच चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही अधिक विनाचष्मा दिसू लागते काही रूग्णांना ११०% तर काहींना १२०% पर्यंत जास्त चांगले दिसू लागते ह्याला (High Definition-HD) म्हटले आहे. ही वैज्ञानीक घटनाच मोठी आश्चर्यजनक व विस्मयकारक असून नवीन पिढीला ह्या सुपर व्हिजनचा अनुभव देण्यासाठी विज्ञान व आमचा अनुभव सज्ज झाला आहे. आता फक्त तरूणांनाच नव्हे तर नवीन तंत्रज्ञानामुळे चाळीशी नंतरही चष्मे व दृष्टिदोष आता घालवता येतात व नैर्गिक दृष्टी प्राप्त होऊ शकते. चष्म्याच्या नंबर घालविण्याच्या प्रचलीत लॅसीक व नवीन स्माईल ह्या पेक्षाही कॉन्टूरा अधिक अचूक व परिणामकारक आहे आणि डॉ. कांकरियांचा कॉन्टूरा उपचा पध्दतीचा अनुभव हा अतिशय मोठया प्रमाणात असून जागतीक सन्मान त्यांना ह्या बद्दल मिळाला आहे.

केरॅाटोकोनस

काही जनांमध्ये बुबुळाची (कॉर्नीया) जाडी कमी होत जाणे व त्यामुळे त्यांच्या गोलाइत दोष निर्माण होऊन सारखा नंबर वाढत जाणे कालांतराने कायमची दृष्टी कमी होते त्यावर टोपोग्राफि, ऑक्यूलायझर वगैरे तपासण्या करून ही लेसर उपचार करता येतात. वेळेवर उपचार न झाल्यास नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया करावी लागते. मोतिबिंदू साठी झेप्टो लेसर तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाद्वारे अचूकता आधिक असते. ही शस्त्रक्रिया वेदनारहित असल्यामुळे ह्यात डोळयांस भूल देण्यासाठी गरज नसते व शस्त्रक्रियेनंतर पट्टीचीही गरज भासत नाही रूग्णास त्वरीत दिसते व गॉगल लावून तो तासाभरात घरीही जाऊ शकतो. २-३ दिवसांत तो आपल्या दैनंदिन कामास लागु शकतो. हया प्रकारच्या शस्त्रक्रियेत नैसर्गिक दृष्टी मिळते व शस्त्रक्रियेचे धोकेही खूपच कमी असतात. कमी वयात मोतीबिंदू, मधुमेह असलेल्यांसाठी तर ही उपचार पध्दती एक वरदानच आहे. दृष्टी मिळते व शस्त्रक्रियेचे धोकेही खूपच कमी असतात. कमी वयात मोतीबिंदू, मधुमेह असलेल्यांसाठी तर ही उपचार पध्दती एक वरदानच आहे. त्याच प्रमाणे ह्या प्रकारच्या उपचारामध्ये मल्टीफोकल, टोरीक अशा अनेक पध्दती उपलब्ध असून रूग्णास चष्म्या विरहीत दृष्टी प्राप्त होऊ शकते. १९८८ साली भारतात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी फेकोइमस्लिफिकेशन ह्या पध्दतीचा प्रथमच उपयोग अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा येथे करण्यात येत होता व ती पध्दती भारतभर लोकप्रिय झाली त्यानंतर डॉ. कांकरिया ह्यांनी मायक्रो फेको, कोल्ड फेको व फेम्टो लेसर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया विकसीत केल्या व मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेतही नेतृत्व दाखवले. आता भारतात प्रथमच झेप्टो लेसर ही जगातील सर्वात अत्याधुनिक उपचार पध्दती मोतीबिंदूच्या उपचारासाठी भारतीयांसाठी उपलब्ध केली असून ही रोबॉटीक लेसर नेत्र शस्त्रक्रिया विकसित केली आहे.